सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी' आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना संयुक्तपणे तीन विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार
अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू 'लिओनेल मेस्सी' याने विक्रमी आठव्यांदा जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा 'बॅलन डी' ओर' पुरस्कार पटकावला.
मॅक्स वस्टॅपेनने 'मेक्सिको सिटी ग्रँड प्रिक्स 2023' चे विजेतेपद पटकावले.
आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचा 38 वा स्थापना दिवस साजरा करणार
'सौदी अरेबिया' 2034 साली फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन करणार आहे.
'फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने पनामा,अल्बानिया व जॉर्डनला 'ग्रे लिस्ट'मधून काढून टाकले.
झारखंड राज्य सरकार 'अबुवा आवास योजने' अंतर्गत बेघरांसाठी 8 लाख घरे बांधणार आहे.
'इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंबली'चे सहावे सत्र नवी दिल्लीत सुरू झाले.
अलिगड मुस्लिम विद्यापीठ स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार.
उत्तर प्रदेश राज्यातील 'अमेठी' येथे दक्षिण पश्चिम आशियातील सर्वात मोठ्या कोका कोला बॉटलिंग प्लांटचे उद्घाटन करण्यात आले आहे.
आसाम राज्य सरकारचे माजी मंत्री 'शरत बारकोटोकी' यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
ज्येष्ठ पत्रकार, कवी आणि लेखक 'डॉ. राकेश पाठक लिखित 'सिंधिया अँड 1857' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्रे असणारे केरळ भारतातील पहिले राज्य बनले आहे.
रोहित शर्मा' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18000 धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला.
'बिगबास्केट'ला 'फेअरवर्क इंडिया रेटिंग 2023' मध्ये अव्वल स्थान मिळाले आहे.





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!